Volunteers

स्वयंसेवक नेटवर्क (Volunteer Network)

"रक्तदानासाठी एकत्र - संस्था स्वतंत्र"

RAKTDATA.IN मध्ये सामील व्हा

आमच्या राष्ट्रीय रक्तदान जनजागृती उपक्रमाचा भाग होऊन समाजासाठी योगदान द्या. स्वयंसेवक म्हणून कार्य करताना तुम्हाला खालील जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात:

प्रमुख जबाबदाऱ्या:

  • रक्तदान जनजागृतीसाठी समन्वय साधणे.
  • रक्तदान क्षेत्रातील कार्यरत संस्था, ब्लड बँका, रुग्णालये व स्वयंसेवक यांच्याशी संवाद वाढवणे.
  • रक्तदान शिबिरांची माहिती Raktdata.in पर्यंत पोहोचवणे.
  • नवीन स्वयंसेवक व संस्थांना नेटवर्कशी जोडण्यासाठी सहकार्य करणे.
  • रक्तदानाविषयी अचूक, विश्वासार्ह व सकारात्मक माहितीचा प्रसार करणे.
  • Raktdata.in च्या आचारसंहितेचे पालन करणे.

अटी व शर्ती:

  • ही नियुक्ती पूर्णपणे स्वयंसेवी स्वरूपाची आहे.
  • या नियुक्तीमुळे रोजगार, वेतन, मानधन किंवा मालकी हक्क निर्माण होत नाही.
  • संबंधित व्यक्ती स्वतःच्या संस्था किंवा सामाजिक कार्यांसह ही भूमिका पार पाडू शकतात.
  • Raktdata.in हे सर्व संस्था आणि रक्तदान क्षेत्रातील घटकांना जोडणारे स्वतंत्र डिजिटल व्यासपीठ आहे.
  • ही नियुक्ती प्रारंभी एका वर्षासाठी वैध राहील आणि कार्याचा आढावा घेऊन तिचे नूतनीकरण केले जाऊ शकते.

आजच नोंदणी करा!

आपल्या सहकार्यामुळे रक्तदान चळवळीला नवी दिशा मिळेल. स्वयंसेवक होण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

स्वयंसेवक नोंदणी

टिप्पण्या